Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आर्थिक लूट; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
February 14, 2026
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आर्थिक लूट; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा
       

औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी  वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज शनिवार (दि. १४)  महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन केले. 

यावेळी औरंगाबाद येथील प्रसिद्ध देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून शुल्काच्या नावाखाली खंडणी वसूल केली जात असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. या संदर्भात शहराध्यक्ष (पश्चिम) राहुल मकासरे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Deogiri College Students Protest)

विद्यार्थांनायाच्या प्रमुख मागण्या:

१) सामाजिक न्याय विभागाचे शासन निर्णय असून देखील आपले महावि‌द्यालय शासन निर्याविरोधात कार्य करताना दिसते जे कर्मचारी है शासन विरोधी कार्य करत असतील किंवा ज्यांच्या आदेशाने हे चालू आहे अशांवर कारवाई करण्यात यावी.

२) मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी वसूल करण्यात आली आहे. ज्यांच्याकडून पैसे वसूल केले अशा वि‌द्यार्थ्यांना पैसे व्याजासहीत परत करण्यात यावे.

३) जनरल कॅटेगिरीचे जे वि‌द्यार्थी आहेत अशा वि‌द्यार्थ्यांकडून जी फीस डिफरन्स अमाऊंट (फरकतील रक्कम) म्हणून वसूल केली जाते ती ज्या कर्मचाऱ्यांनी वसूल केली आहे त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, व त्यांच्याकडून जेवढी फी वि‌द्यापीठ परीक्षा मंडळाने ठरवून दिली आहे फक्त तीच भरून घ्यावी.

४) मुलींना शिक्षण मोफत आहे याचे परिपत्रक राज्यशासने काढले आहे परंतु, आपल्या महाविद्यालयात मुलींकडून पैसे वसूल केले जात आहेत, हे तत्काळ थांबवावे. ०९ जुलै २०२४ पासून ज्या विद्यार्थिनींचे पैसे वसूल करण्यात आले आहे ते १५ दिवसांच्या आत व्याजासहित परत ‌द्यावे.

५) राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे अपघाती निधन झाले, याचा शोक सर्व देश आणि राज्य करत आहेत. तारखा पुढे ढकलून स्पोर्ट्स, गॅदरींग व इतर कार्यक्रम दर वर्षी प्रमाणे प्रमाणे घेण्यात यावे.

६) वि‌द्यार्थी आणि महावि‌द्यालयाच्या चुकीमुळे वि‌द्यार्थाला 2 PRN तयार झाले आहे. त्याने वारंवार आपल्याकडे फेऱ्या मारल्या. परंतु त्याच्या समस्येचे निराकरण करण्याऐवजी आपण त्याला धमक्या देत आहात, त्याची समस्या तत्काळ सोडवण्यात यावी.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची पायमल्ली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राहुल मकसरे यांनी केली आहे. तसेच, वाढीव फीमुळे विद्यार्थ्यांना जो मानसिक आणि आर्थिक त्रास झाला, त्याबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. (Deogiri College Students Protest)

महाविद्यालय प्रशासन जर विद्यार्थ्यांच्या हिताचे शासन निर्णय धाब्यावर बसवून लूट करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास संविधानिक मार्गाने मोठे जनआंदोलन उभे केले जाईल. असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर अध्यक्ष राहुल मकसरे यांनी म्हणाले. यावेळी विद्यार्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन घोषणा दिल्या. यावेळी राहुल मकासरे (शहराध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी), सोनाली चौतमल , कपिल चव्हाण आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.


       
Tags: aurangabadMaharashtraPoliticalstudentVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एखादी ‘नस’ डोनाल्ड ट्रम्पच्या हातात – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

मरण स्वस्त झालय! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन ते चार जण गंभीर जखमी

Next Post
मरण स्वस्त झालय! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन ते चार जण गंभीर जखमी

मरण स्वस्त झालय! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन ते चार जण गंभीर जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार
बातमी

मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार

by mosami kewat
March 27, 2026
0

मध्य प्रदेश: मध्यप्रदेशात एका धक्कादायक प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झालेल्या...

Read moreDetails
बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

March 27, 2026
शिक्षकाच्या आत्महत्येने बीड हादरले; ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

शिक्षकाच्या आत्महत्येने बीड हादरले; ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

March 27, 2026
महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 

महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 

March 27, 2026
अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना

अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना

March 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home