Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एखादी ‘नस’ डोनाल्ड ट्रम्पच्या हातात – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
February 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एखादी ‘नस’ डोनाल्ड ट्रम्पच्या हातात – ॲड. प्रकाश आंबेडकर
       
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हातातील बाहुलीसारखे वागत आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. मोदींच्या या धोरणांमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. 

ते म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प जे सांगतात, तेच मोदी करतात. रशियाकडून तेल खरेदी न करण्याच्या अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकला असून, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यात आली आहे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. (Prakash ambedkar)

भारतीय कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्याचे पाऊल उचलले जात असून, यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे हित धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच टेक्सटाईलवरील (कापड उद्योग) आयात शुल्क २.५ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ही वाढ उद्योगासाठी मारक असतानाही पंतप्रधान मोदी याला चांगली गोष्ट म्हणत आहेत. हे अनाकलनीय आहे. (Prakash ambedkar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एखादी ‘नस’ जणू डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात लागली आहे आणि त्याद्वारे ते मोदींना नाचवत आहेत, अशी भावना निर्माण होत आहे. ही परिस्थिती देशासाठी अपमानास्पद असून जनहिताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. विरोधी पक्षांची तातडीने बैठक बोलावून या मुद्द्यावर देशभर जनआंदोलन उभे करावे, जेणेकरून देशाला या दबावातून मुक्त करता येईल, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Tags: bjpDonald TrumpEconomicsGlobal newsMaharashtramumbainarendra modiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

रमाई आवास योजनेचा बोजवारा; १० वर्षांपासून १२३ घरकुले प्रलंबित! वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

Next Post

देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आर्थिक लूट; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home