Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 11, 2024
in राजकीय
0
स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करा
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा चंद्रपूर जिल्ह्यात प्रचार दौरा

वणी : स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर या सरकारला आणि भाजपच्या उमेदवाराला पाडा, तरच तुमचे स्वातंत्र्य अबाधित राहील. नाहीतर लोकशाहीची हुकूमशाही कधी होईल, हे सुध्दा कळणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. ते गडचांदूर येथील सभेत बोलत होते.

भाजपचा समाचार घेताना आंबेडकर म्हणाले की, व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की, पाहिजे तेवढे पैसे भाजपला द्या, पण मतदान देवू नका. देशाचा पंतप्रधान हा हप्ताबहादुर आहे. आरएसएसवाल्यांनो, तुम्ही याचा प्रचार करणार आहात काय ? ते मला सांगा. इथला टीव्ही मीडिया या गोष्टी बोलत नाही, पण देशाच्या बाहेर चर्चा सुरू आहे की, भारताचा पंतप्रधान हा गल्लीतला दादा आहे आणि वसुली करणारा माणूस आहे. सनातनवाल्यांना विचारतो की, असा वसुलीखोर तुम्हाला पंतप्रधान म्हणून पाहिजे का ? असा टोलाही त्यांनी लगावला.

आंबेडकर म्हणाले की, एका बाजूने चीन छाताडावर बसलाय दुसऱ्या बाजूने पाकिस्तान आहे. दर एक ते दोन दिवसात एक जवान काश्मीर खोऱ्यात शहीद होतो. पण तुम्ही कधी एक बातमी ऐकलीय का की, पाकिस्तानचा एक जवान मागच्या सहा महिन्यांत शहीद झाला आहे. 56 इंचाची छाती आता 14 इंचाची झाली आहे हे लक्षात घ्या. तो आदेश देऊ शकत नाही. मोदी आणि भाजप 150 जागा जिंकू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

ते कधीही भाजपसोबत जातील…
शिवसेना (ठाकरे गट) यांना आम्ही जेव्हा म्हटलं की, आपण धर्मनिरपेक्ष मतं घेत आहोत, त्यांना आपण लिहून देऊ की, 5 वर्षे आपण भाजपसोबत जाणार नाही, तर ते ताडकन उठले आणि म्हणाले की, आम्ही लिहून देणार नाही. यांचा भाजपसोबत जाण्याचा विचार आहे हे लक्षात घ्या आणि आम्ही यांच्या सोबत युती करायची. जे धर्मनिरपेक्ष मतं घेतील आणि भाजपसोबत जातील, असेही आंबेडकर म्हणाले.


       
Tags: chandrapurLoksabhaMaharashtraparlimentry electionPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित

Next Post

डॉ. आंबेडकर जयंतीची रक्कम दिली वंचितांच्या लढ्यासाठी..!

Next Post
डॉ. आंबेडकर जयंतीची रक्कम दिली वंचितांच्या लढ्यासाठी..!

डॉ. आंबेडकर जयंतीची रक्कम दिली वंचितांच्या लढ्यासाठी..!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवडमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मुस्लिम समाजासोबत महत्त्वाची बैठक; नव्या समीकरणांची चर्चा
बातमी

पिंपरी-चिंचवडमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मुस्लिम समाजासोबत महत्त्वाची बैठक; नव्या समीकरणांची चर्चा

by mosami kewat
December 29, 2025
0

पिंपरी : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित...

Read moreDetails
BMC निवडणूक २०२६: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर

BMC निवडणूक २०२६: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर

December 29, 2025
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक  2026 : वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 : वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर

December 29, 2025
औरंगाबाद मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी!

औरंगाबाद मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी!

December 29, 2025
प्रदीप बापू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास २५ हजारांचे धम्मदान

प्रदीप बापू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास २५ हजारांचे धम्मदान

December 29, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home