अकोला : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सवाल उपस्थित करत म्हटले आहे की, प्रिय काँग्रेस, आम्ही कोणाशी बोलावे? तुमचे नेमलेले नेते भाजपच्या वाटेवर जात आहेत. त्यामुळे आता आम्ही कोणाशी बोलावे?
2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीशी युतीच्या चर्चेसाठी नेमले होते. मात्र, तेच भाजपमध्ये गेले.
2024 च्या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांना काँग्रेसने केवळ चर्चेसाठी नव्हे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनही नेमले होते. पण, ते देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ज्यांना आघाडीच्या चर्चा करण्यासाठी काँग्रेस पुढे करीत आहे, तेच नेते भाजपकडे जात असल्याने आम्ही कोणाशी बोलावे, हे आता काँग्रेसने आम्हाला सांगावे, असे अंजलीताई आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.