Mumbai constitution honor assembly : वंचित बहुजन आघाडीकडून २५ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे ‘संविधान सन्मान महासभा’चे आयोजन करण्यात आले आहे.
“आपला देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानेच चालेल, मनुस्मृतीने नाही” असा संदेश असलेला बॅनर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहा जवळ लावण्यात आला आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड: लक्ष्मण नगर बस स्टॉपजवळ PMPML बसची शाळकरी मुलीला धडक; तरुणी गंभीर जखमी
भारतीय संविधान आणि मनुस्मृती यांची तुलना करत मनुस्मृतीला नाकारणारा आणि संविधानाला मान्यता देणारा स्पष्ट संदेश यात देण्यात आला आहे.
याचबरोबर दुसऱ्या बॅनरमध्ये निवडणुका येताच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या कामात सहभागी होत असल्याचा, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे. या फलकावर “एक संधी वंचितला” असा संदेश देत समर्थनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमामुळे सामाजिक, संविधानिक मूल्ये आणि वंचित समाजाच्या हक्कांच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.






