Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेसच्या नेत्यांचा वंचितमध्ये प्रवेश

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 19, 2024
in राजकीय
0
काँग्रेसच्या नेत्यांचा वंचितमध्ये प्रवेश
       

शेकडो कार्यकर्त्यांचीही काँग्रेसला सोडचिठ्ठी

अकोला : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला वाढत असून, पातूर तालुक्याचे काँग्रेस उपाध्यक्ष मो. मुजीब मो. यासीन, उपसरपंच आळेगाव जलाउद्दीन जुलफुद्दीन यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत यशंवत भवन येथील निवासस्थानी वंचितमध्ये प्रवेश केला.

अकोला लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मुस्लिमविरोधी आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचे संघटक म्हणून काम करणाऱ्या अभय पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे मुस्लिम समाजात नाराजी आहे. मुस्लिम समाजाने हा उमेदवार नको म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. मात्र, तरीही पाटील यांना उमेदवारी दिली. याचा विरोध म्हणून काँग्रेसमधून राजीनामा देणाऱ्यांची संख्या वाढली असल्याची चर्चा अकोला शहरात आहे.

तसेच, दुसरीकडे बाळासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम समाजासाठी केलेल्या आंदोलन आणि कार्यामुळे मुस्लिम समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. त्याचीच पावती म्हणून पातूरमधील काँग्रेस उपाध्यक्ष मो. मुजीब मो. यासीन, उपसरपंच आळेगाव जलाउद्दीन जुलफुद्दीन, मुलकोद्दीन सिराजोद्दीन, शेख रफीक शेख नंदू, मो. सऊद मो. अनीस, नसीरोरोद्दीन अनिसोद्दीन, मुनीर खान समशीर खान, फहोमोद्दीन खतीबोद्दीन, मो. वासीफुर रहमान, मो. यूसुफ मो. इक़बाल, मजीद शेख सलीम, रज्जाक खलील, मुख्तार खान, हुसैन खान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.


       
Tags: AkolaLoksabhaMaharashtraParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

उत्कर्षा रूपवते शिर्डीतून ‘वंचित’ कडून रिंगणात

Next Post

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना संसदेत पाठवूया

Next Post
ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना संसदेत पाठवूया

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना संसदेत पाठवूया

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Free Sanitary Pads : मोठा निर्णय! आता शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्यांना आदेश
बातमी

Free Sanitary Pads : मोठा निर्णय! आता शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्यांना आदेश

by mosami kewat
January 30, 2026
0

​नवी दिल्ली: आज सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे स्त्रीशक्तीच्या आरोग्याला  खऱ्या अर्थाने नवी झळाळी मिळाली आहे. ​"मासिक पाळी दरम्यान आरोग्य...

Read moreDetails
पिंपरी चिंचवड : काळेवाडी फाट्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चालक फरार

पिंपरी चिंचवड : काळेवाडी फाट्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चालक फरार

January 30, 2026
बहुराष्ट्रीय भांडवल विरुद्ध राष्ट्रवाद: जागतिक एलिट्सची वाढती अस्वस्थता

बहुराष्ट्रीय भांडवल विरुद्ध राष्ट्रवाद: जागतिक एलिट्सची वाढती अस्वस्थता

January 30, 2026
संविधान आणि राष्ट्रध्वज हातात घेऊन वंचितच्या नगरसेवकांचा अकोला महापालिकेत दिमाखदार प्रवेश

संविधान आणि राष्ट्रध्वज हातात घेऊन वंचितच्या नगरसेवकांचा अकोला महापालिकेत दिमाखदार प्रवेश

January 30, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी ३१ जानेवारीला जानवळमध्ये सुजात आंबेडकर यांची सभा!

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी ३१ जानेवारीला जानवळमध्ये सुजात आंबेडकर यांची सभा!

January 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home