ऑल इंडिया मिल्ली कौन्सिलच्या बैठकीतील सुत्रांची प्रबुद्ध भारताला माहिती !
मुंबई – ऑल इंडिया मिल्ली कौन्सिलची मिटिंग नुकतीच 16 जानेवारी रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीतील खात्रीलायक सूत्रांनी प्रबुद्ध भारताला माहिती दिली आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही मुस्लिम नेत्यांशी बोलतांना सांगितले की, वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीत समावेश केला जाणार नाही.
गेल्या 3 आठवड्यातील हा दुसरा प्रसंग आहे की, नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत घेतले असे भाष्य केले आहे.
गेल्या डिसेंम्बर महिन्यात नागपुरातील महाराष्ट्रातील दोन वरीष्ठ पत्रकारांचे खाजगीमधील व्हाट्सअप्प वरील संभाषण व्हायरल झाले होते. त्यावेळी नागपुरात ‘हे तयार हम’ या सभेच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी ह्याच विधानाचा पुनरुच्चार केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील धक्कादायक घटना मानली जात आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने भाजप- आरएसएसचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीत समावेश करण्याचं आवाहन करत आहेत. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने 4 पत्र काँग्रेस पक्षाला दिले आहेत.
१ सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, २४ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी, २८ डिसेंम्बर रोजी मल्लिकार्जुन खर्गे आणि ह्याच वर्षी १६ जानेवारी रोजी राहुल गांधी यांना पत्र. यातील ३ पत्र स्वतः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहले आहेत. त्यांचे आवाहन असूनही इंडिया आघाडी, महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश अजून झालेला नाहीये.
महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी मोठी ताकद राखून आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४० लाख मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळाले होते. महाराष्ट्रातील लहान-लहान जाती समूह यांचा बुलंद आवाज म्हणून उभा आहे. आज राज्यभरात वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम, ओबीसी, गरीब मराठा, दलित आणि आदिवासींचा मोठा पाठिंबा आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कोणत्याही पक्षांसोबत युती न केल्यामुळे भाजपचा पराभव करण्यास ते मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये अपयशी ठरले आहेत आणि महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा 0 खासदार आहे.
वंचित बहुजन आघाडी आपल्या बाजूने इंडिया आघाडीत येण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष शिवसेनेसोबत एकत्र आले नाही तर वंचित – शिवसेना 50 टक्के जागा वाटून घेणार आणि सर्व जण एकत्र सोबत आले तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी 12+12+12+12 जागा लढवाव्यात असा फॉर्म्युला सुद्धा देण्यात आला होता.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी भाष्य केले होते की, जर इंडिया आघाडी, महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश नाही झाला, तर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना 24-24 लोकसभा जागांवर निवडणूक लढेल.