पुणे: प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळल्याने, वंचित बहुजन आघाडीने पुण्यात आक्रमक भूमिका घेतली. वेगवेगळी जिल्ह्यातून आक्रमक भूमिका घेत गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांकडून आंदोलने करण्यात आले. तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बुधवारी (दि.२७) पुण्यात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. गिरीश महाजन यांच्या विरोधात महाराष्ट्रभर पडसाद उमटले. (Vanchit bahujan aghadi)

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळले. हा प्रकार अनावधानाने नसून जाणीवपूर्वक केल्याचे कार्यकर्त्यांनी म्हणले. तसेच या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाची लाट उसळली आहे.
आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पुण्याच्या बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे अधिकृत पत्र आणि तक्रार अर्ज पोलिसांना देण्यात आला. “महापुरुषांचा अवमान करणाऱ्या मंत्र्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. (Vanchit bahujan aghadi)

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी विशाल गवळी, सागर आल्हाट, विशाल कसबे, किरण कदम, गौतम ललकारे, बी. पी. सावळे, नवनीत अहिरे, नितीन कांबळे, चंद्रकांत कांबळे, चैतन्य इंगळे, रेखा चौरे व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.





