Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

mosami kewat by mosami kewat
January 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
       
बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.  या अपघातात अजित पवारांसह अन्य पाच जणांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.

अजित पवार यांच्या जाण्याने नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. आज सामान्य जनतेच्या डोळ्यांत अश्रू आहेत. त्यांच्या जाण्याने अजूनही विश्वास बसत नाही. “कामाचा माणूस गेला, आमचा दादा गेला” अशा शब्दांत जनता त्यांच्या कार्याची आठवण काढत आहे. आपल्या कामात ते नेहमीच चोख आणि तत्पर होते, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (Ajit Pawar plane crash)

राज्य सरकारने या दुर्दैवी घटनेनंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (२९ जानेवारी) सकाळी ११ वाजता बारामती येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गुरुवारी सकाळी ६ ते ९ वाजेच्या काळात अजित पवारांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे अंतिम दर्शनासाठी नेण्यात येईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानावर आणण्यात येणार असून, ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Ajit Pawar plane crash)

अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर बारामतीत दाखल होणार आहेत.

राजकीय, सामाजिक तसेच मनोरंजन क्षेत्रातूनही त्यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया उमटली आहेत.  सध्या बारामतीमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tags: Ajit PawarBaramat icmDmEconomicsMaharashtraPlane crashPoliticalpuneVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल

Next Post

कोलंबियात लँडिंगदरम्यान प्रवासी विमान कोसळले; १५ जणांचा मृत्यू

Next Post
कोलंबियात लँडिंगदरम्यान प्रवासी विमान कोसळले; १५ जणांचा मृत्यू

कोलंबियात लँडिंगदरम्यान प्रवासी विमान कोसळले; १५ जणांचा मृत्यू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home