Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल

mosami kewat by mosami kewat
January 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल
       
पुणे: प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळल्याने, वंचित बहुजन आघाडीने पुण्यात आक्रमक भूमिका घेतली. वेगवेगळी जिल्ह्यातून  आक्रमक भूमिका घेत गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांकडून आंदोलने करण्यात आले. तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बुधवारी (दि.२७) पुण्यात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. गिरीश महाजन यांच्या विरोधात महाराष्ट्रभर पडसाद उमटले. (Vanchit bahujan aghadi)

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळले. हा प्रकार अनावधानाने नसून जाणीवपूर्वक केल्याचे कार्यकर्त्यांनी म्हणले. तसेच या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाची लाट उसळली आहे.

आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पुण्याच्या बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे अधिकृत पत्र आणि तक्रार अर्ज पोलिसांना देण्यात आला. “महापुरुषांचा अवमान करणाऱ्या मंत्र्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. (Vanchit bahujan aghadi)

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी विशाल गवळी, सागर आल्हाट, विशाल कसबे, किरण कदम, गौतम ललकारे, बी. पी. सावळे, नवनीत अहिरे, नितीन कांबळे, चंद्रकांत कांबळे, चैतन्य इंगळे, रेखा चौरे व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Tags: bjpConstitutionDr Babasaheb AmbedkarGirish MahajanMaharashtranashikPoliticalRepublic day 2026rssVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

धर्मनिरपेक्ष संविधानामुळेच भारत टिकला – डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

Next Post

महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post
महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन
बातमी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

by mosami kewat
August 30, 2026
0

जालना : परमेश्वर हिवाळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली २३ मे २०२६ रोजी कैन्हानगर, जालना येथे अमानुषपणे शेण चारून,...

Read moreDetails
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

August 30, 2026
झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home