मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सामाजिक न्याय आणि समानतेचे पुरस्कर्ते असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले आणि वंचित बहुजन आघाडी त्यांच्याच आदर्शांवर चालत असल्याचे सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, तसेच प्रवक्ते अंबरसिंग चव्हाण, विश्वास सरदार आणि मिलिंद लहाने यांचा समावेश होता. उपस्थितांनी शाहू महाराजांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
Mahabodhi Mahavihara Protest : मुंबईत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!
मुंबई - महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी आज मुंबईत भव्य...
Read moreDetails