नवी मुंबई : भारतीय बौद्ध महासभा, नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर समारंभ मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. संस्कार विभागाचे उपाध्यक्ष विजय झनके गुरुजी (केंद्रिय शिक्षक) यांच्या अध्यक्षतेखाली सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर भवन, पंचशील बुद्ध विहार, तुर्भे स्टोअर, नवी मुंबई येथे पार पडला.
आषाढ पौर्णिमेपासून (१० जुलै २०२५) ते आश्विन पौर्णिमेपर्यंत (०७ ऑक्टोबर २०२५) नवी मुंबई जिल्ह्यात हे भव्य प्रशिक्षण शिबीर सुरू होते, ज्याचा समारोप झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सचिव तथा केंद्रिय प्रशिक्षण विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. एस. वानखडे यांच्या हस्ते, तसेच नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष नामदेव जगताप गुरुजी, संजय झनके गुरुजी, प्रकाश माने आणि इतर पदाधिकारी व शाखा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामूहिक त्रिसरण पंचशील आणि बुद्धपूजा घेण्यात आली.
उपस्थित मान्यवर, शाखा पदाधिकारी आणि प्रशिक्षण शिबिरातील प्रवचनकार यांचा जिल्हा कार्यकारीणीने सत्कार केला. प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा कार्यकारिणी व प्रवचनकारांचे कौतुक केले.
डॉ. वानखडे यांचे मार्गदर्शन –
प्रकाश माने गुरुजी आणि नामदेव जगताप गुरुजी यांनी शिबीर समारोप कार्यक्रमात शुभेच्छा देऊन आपले विचार व्यक्त केले.
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव व विभागप्रमुख डॉ. एस. एस. वानखडे साहेब यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि शिबिरार्थींना बौद्धाचार्य परीक्षेच्या संदर्भात अप्रतिम मार्गदर्शन केले. त्यांनी मार्मिक उदाहरणे देऊन शिबिरार्थींमध्ये उत्साह निर्माण केला व धम्मकार्य पुढे जोमाने करण्यासाठी ऊर्जा दिली.
“आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक आहोत आणि त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहून कार्य केले पाहिजे, समाजाचे ऋण फेडले पाहिजे,” असे ते म्हणाले. बुद्धीचातुर्य आणि अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय झनके गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त करून शिबिरार्थींना परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना देत शुभेच्छा दिल्या. हा शिबीर समारंभ यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी, विशेषत: संस्कार विभागाचे उपाध्यक्ष विजय झनके गुरुजी, प्रकाश भालेराव व राजेंद्र झेंडे गुरुजी यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच, सतिष खंडाळे (अध्यक्ष – पंचशील बुद्ध विहार तुर्भे स्टोअर), मा. संतोष जाधव, अप्पासाहेब खंडाळे, अनिल सुरडकर आणि इतर शिबिरार्थींनी मोलाचे सहकार्य आणि मेहनत घेतली. या सोहळ्यास सर्व केंद्रिय शिक्षक, केंद्रिय शिक्षिका, जिल्हा पदाधिकारी, शाखा पदाधिकारी आणि बौद्धाचार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली
पिंपरी-चिंचवड : प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून रस्त्यावर आलेल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बस आता प्रवाशांसाठीच धोकादायक ठरत आहेत की काय, असा प्रश्न पुन्हा...
Read moreDetails