Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Jalna : जातीय द्वेषातून भिल्ल समाजाची घरे पाडले; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
October 9, 2025
in बातमी
0
जातीय द्वेषातून भिल्ल समाजाची घरे पाडले; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

जातीय द्वेषातून भिल्ल समाजाची घरे पाडले; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

जालना : घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी येथे शबरी घरकुल योजने अंतर्गत बांधण्यात आलेली भिल्ल समाजातील घरे सामाजिक व राजकीय द्वेषातून पाडल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आणि पाडलेली घरे पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे.
‎
‎घरे पाडण्यास ग्रामसेवक, सरपंच आणि गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत, डोके यांनी त्यांच्यामार्फत झालेल्या या कृतीची योग्य ती चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीसाठी त्यांनी एकलव्य संघटना आणि भिल्ल समाज बांधवांसह निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.
‎
‎यावेळी डोके यांनी जिल्हाधिकारी अमीशा मित्तल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती मिळाली आहे.
‎
‎मात्र, जर या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून दोषींवर कारवाई झाली नाही आणि पाडलेली घरे पुर्ववत करण्यात आली नाहीत, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी दिला आहे.
‎
‎यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळु बर्डे, वंचित बहुजन आघाडीचे घनसावंगी तालुकाध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाबासाहेब गालफाडे, तालुका संघटक बाबासाहेब सोनोवने, संतोष मगर यांच्यासह भिल्ल समाज बांधव आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Bhil CommunityCaste ViolenceHouse Demolitionjalnasocial injusticeVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

सोलापुरात ‘बुद्ध धम्म आणि मानवतावाद’ विषयावर वर्षावास व्याख्यानमालेची सांगता; अंधश्रद्धा निर्मूलनाचे आवाहन

Next Post

नवी मुंबईत बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न!

Next Post
नवी मुंबईत बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न!

नवी मुंबईत बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home