Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

नवी मुंबईत बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न!

mosami kewat by mosami kewat
October 9, 2025
in Uncategorized
0
नवी मुंबईत बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न!

नवी मुंबईत बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न!

       

‎नवी मुंबई : भारतीय बौद्ध महासभा, नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर समारंभ मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. संस्कार विभागाचे उपाध्यक्ष विजय झनके गुरुजी (केंद्रिय शिक्षक) यांच्या अध्यक्षतेखाली सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर भवन, पंचशील बुद्ध विहार, तुर्भे स्टोअर, नवी मुंबई येथे पार पडला.
‎
‎आषाढ पौर्णिमेपासून (१० जुलै २०२५) ते आश्विन पौर्णिमेपर्यंत (०७ ऑक्टोबर २०२५) नवी मुंबई जिल्ह्यात हे भव्य प्रशिक्षण शिबीर सुरू होते, ज्याचा समारोप झाला.
‎
‎कार्यक्रमाच्या ‎सुरुवातीला राष्ट्रीय सचिव तथा केंद्रिय प्रशिक्षण विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. एस. वानखडे यांच्या हस्ते, तसेच नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष नामदेव जगताप गुरुजी, संजय झनके गुरुजी, प्रकाश माने आणि इतर पदाधिकारी व शाखा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामूहिक त्रिसरण पंचशील आणि बुद्धपूजा घेण्यात आली.
‎
‎उपस्थित मान्यवर, शाखा पदाधिकारी आणि प्रशिक्षण शिबिरातील प्रवचनकार यांचा जिल्हा कार्यकारीणीने सत्कार केला. प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा कार्यकारिणी व प्रवचनकारांचे कौतुक केले.
‎
‎डॉ. वानखडे यांचे मार्गदर्शन –
‎
‎प्रकाश माने गुरुजी आणि नामदेव जगताप गुरुजी यांनी शिबीर समारोप कार्यक्रमात शुभेच्छा देऊन आपले विचार व्यक्त केले.
‎
‎भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव व विभागप्रमुख डॉ. एस. एस. वानखडे साहेब यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि शिबिरार्थींना बौद्धाचार्य परीक्षेच्या संदर्भात अप्रतिम मार्गदर्शन केले. त्यांनी मार्मिक उदाहरणे देऊन शिबिरार्थींमध्ये उत्साह निर्माण केला व धम्मकार्य पुढे जोमाने करण्यासाठी ऊर्जा दिली.
‎
‎ “आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक आहोत आणि त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहून कार्य केले पाहिजे, समाजाचे ऋण फेडले पाहिजे,” असे ते म्हणाले. बुद्धीचातुर्य आणि अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा, असा संदेश त्यांनी दिला.
‎
‎कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय झनके गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त करून शिबिरार्थींना परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना देत शुभेच्छा दिल्या. ‎हा शिबीर समारंभ यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी, विशेषत: संस्कार विभागाचे उपाध्यक्ष विजय झनके गुरुजी, प्रकाश भालेराव व राजेंद्र झेंडे गुरुजी यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच, सतिष खंडाळे (अध्यक्ष – पंचशील बुद्ध विहार तुर्भे स्टोअर), मा. संतोष जाधव, अप्पासाहेब खंडाळे, अनिल सुरडकर आणि इतर शिबिरार्थींनी मोलाचे सहकार्य आणि मेहनत घेतली. या सोहळ्यास सर्व केंद्रिय शिक्षक, केंद्रिय शिक्षिका, जिल्हा पदाधिकारी, शाखा पदाधिकारी आणि बौद्धाचार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: Buddhist Acharya Training CampMaharashtranew mumbaiVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Jalna : जातीय द्वेषातून भिल्ल समाजाची घरे पाडले; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Next Post

पूरग्रस्तांचे पॅकेज: केवळ खर्चाची भरपाई की, ‘उत्पन्न’ देणाऱ्या साधनांची पुनर्स्थापना?

Next Post
पूरग्रस्तांचे पॅकेज: केवळ खर्चाची भरपाई की, 'उत्पन्न' देणाऱ्या साधनांची पुनर्स्थापना?

पूरग्रस्तांचे पॅकेज: केवळ खर्चाची भरपाई की, 'उत्पन्न' देणाऱ्या साधनांची पुनर्स्थापना?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी
बातमी

फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी

by mosami kewat
August 15, 2026
0

कळमनुरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ कळमनुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निषेध...

Read moreDetails
कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा

कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा

August 15, 2026
कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

August 15, 2026
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

August 15, 2026
शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

August 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home