जालना : बोरगांव येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमात ‘प्रबुद्ध भारत’ अंकाचे विमोचन
जालना तालुक्यातील बोरगांव येथे दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी धम्म रॅली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या वाचन समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष कार्यक्रमादरम्यान, ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकाच्या १ ते १५ ऑक्टोबर या अंकांच्या विमोचनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात धम्म रॅलीने झाली, त्यानंतर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या सामूहिक वाचनाच्या समाप्तीनिमित्त समारोपीय सोहळा पार पडला. यावेळी मंचावर भंते चंद्रमनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, दिलीप मगर, गौतम वाघमारे, एकनाथ मानकर, विठ्ठल खाडे, नाशिकेत खैरे, कल्याण कायंदे, रामदास कायंदे, सुनील तुरेराव, मदन डोके, अशोक नितनवरे आदी प्रमुख व्यक्तींचा समावेश होता. तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली
पिंपरी-चिंचवड : प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून रस्त्यावर आलेल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बस आता प्रवाशांसाठीच धोकादायक ठरत आहेत की काय, असा प्रश्न पुन्हा...
Read moreDetails