मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २०२६ च्या रणधर्मासाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज आपल्या उमेदवारांची दुसरी अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे.
यंदा मुंबईत काँग्रेससोबत झालेल्या ऐतिहासिक युतीनंतर वंचितने आपल्या वाट्याला आलेल्या ६२ जागांपैकी महत्त्वाच्या प्रभागांतील नावे या यादीत निश्चित केली आहेत.
२५ वर्षांनंतरची मोठी युती
जवळपास अडीच दशकांनंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मुंबईत एकत्र निवडणूक लढवत आहेत. या युतीमुळे मुंबईतील दलित आणि मुस्लिम मतांचे समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. वंचितने आपल्या दुसऱ्या यादीत समाजातील उपेक्षित, कष्टकरी आणि सुशिक्षित तरुणांना प्राधान्य देऊन निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे.
दुसऱ्या यादीतही पक्षाने निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या चेहऱ्यांवर विश्वास दर्शवला आहे. मुंबईतील धारावी, चेंबूर, मानखुर्द, मुलुंड आणि अणुशक्ती नगर यांसारख्या महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये वंचितची ताकद लक्षात घेता, या भागातील उमेदवारांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दुसरी यादी जाहीर होताच मुंबईतील वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मंगळवार (३० डिसेंबर) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व उमेदवार आता आपापल्या प्रभागात शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्याची तयारी करत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे –
– तेजस्वी उपासक गायकवाड, वॉर्ड क्रमांक. 38, उत्तर मुंबई
– मनिषा सुरेश रेवाळे, वॉर्ड क्रमांक. 42, जिल्हा उत्तर मुंबई
– नितीन विठ्ठल वळवी, वॉर्ड क्रमांक. 53, उत्तर पश्चिम मुंबई
-उषा शाम तिरपुडे, वॉर्ड क्रमांक. 56, उत्तर पश्चिम मुंबई
– पीर मोहम्मद मुस्ताक शेख, वॉर्ड क्रमांक. 67, उत्तर पश्चिम मुंबई
– परमजीतसिंग गुंबर, वॉर्ड क्रमांक. 68, उत्तर पश्चिम मुंबई
– अशोक गुज्जेटी, वॉर्ड क्रमांक. 194, दक्षिण मुंबई
– अस्मिता डोळस, वॉर्ड क्रमांक. 197, दक्षिण मुंबई
– नंदिनी जाधव, वॉर्ड क्रमांक. 199, दक्षिण मुंबई
– विलास शांताराम सकपाळ, वॉर्ड क्रमांक. 225, दक्षिण मुंबई






