मुंबई: आता कसलेही तत्व आणि नैतिकता न बाळगता, भाजप- आरएसएस राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचा राजकीय फायद्यासाठी वापर करून देवालाच काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत.भाजप आरएसएस देवाला EVM प्रमाणे वापरत आहेत असे म्हणत, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजप – आरएसएसवर निशाणा साधला आहे.
मागच्या १० वर्षांत भाजप आरएसएस ने बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर, भगत सिंग यांसारख्या अनेक भारतीय महापुरुष व त्यांच्या वारशांना काबीज करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांचे स्वतःचे असे कोणतेही महापुरुष नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.
हे लज्जास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.