Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीने निवडलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थ्यांची फसवणूक, प्रक्रिया सुरू

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 11, 2023
in बातमी
0
बार्टीने निवडलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थ्यांची फसवणूक, प्रक्रिया सुरू
       

२०० विद्यार्थ्यांनाच फेलोशिप अवॉर्ड करण्याची विश्वासघात प्रक्रिया सुरू.

अकोला – डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत बार्टी १ फेब्रुवारी २०२३ नुसार सचिव सामाजिक न्याय विभागास दिलेल्या निवडसूची नुसार ८६१ विद्यार्थी पात्र करण्यात आले होते मात्र १ फेब्रुवारी २०२३ रोजी २०० विद्यार्थ्यांची यादी रद्द समजावे आणि सरसकट ८६१ पात्र विध्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी असे पत्र देणाऱ्या योजना विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे स्नेहल भोसले ह्यांनी यु टर्न घेत १० एप्रिल रोजी केवळ २०० विद्यार्थी निवड करण्यात आल्याचे पत्र काढले आहे.हा उर्वरित ६६१ विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप वंचित युवा आघाडी राज्य महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.

सरसकट फेलोशिप अवॉर्ड ८६१ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी संशोधक विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत.त्यामुळे बार्टी ने अनुक्रमे २६ डिसेंबर २०२२ रोजी महासंचालक धम्मज्योती गजभिये आणि योजना विभाग प्रमुख स्नेहल भोसले ह्यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी सरसकट ८६१ विद्यार्थी पात्र असल्याचे शासनाला दिलेल्या पत्रानुसार जाहीर केले होते.कार्यक्रम अधिकारी भोसले ह्यांनी ३२ व्या बैठकीमध्ये विषय क्र. ७ च्य मान्यतेनुसार एकूण २०० विद्यार्थ्यांना सदर अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मान्यता मिळाली होती ती केवळ २०० विद्यार्थ्यांची सूची ग्राह्य न धरता ८६१ विद्यार्थी बार्टी द्वारे पात्र करण्यात आले
एकूण सर्व ८६१ पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याबाबत आदेश लवकरात लवकर निर्गमित करावे, अशी मागणी सचिव सामाजिक न्याय विभाग ह्यांचे कडे केली होती. ह्या बाबत मुख्यमंत्री पातळीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नरत असतांना आज स्नेहल भोसले, विभागप्रमुख योजना विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे ह्यांनी १० एप्रिल रोजी घोषणापत्र जाहीर केले आहे.सदर घोषणापत्र ही सरसकट विद्यार्थी निवडीच्या विपरीत असून हा विद्यार्थ्यांचे विश्वासघात पत्रक आहे.नवनियुक्त बार्टी महासंचालक सुनील वारे ह्यांचे मान्यतेने हे विश्वासघात पत्रक काढुन (बार्टी) पुणे मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF) २०२१ करीता ३२ व्या मा. नियामक मंडळाच्या विषय क्र.८ मान्य निर्णयानुसार एकूण २०० विद्यार्थ्यांची निवड यादी व त्याअनुषंगाने विद्या शाखानिहाय प्रतिक्षा यादी या घोषणा पत्राद्वारे बार्टीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याचा बनाव करण्यात आला आहे.त्यानुसार दि. १२/०४/२०२३ ते १३/०४/२०२३ रोजी निवड झालेल्या केवळ २०० विद्यार्थ्यांना अवार्ड लेटर देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.ही बनवाबनवी युवा आघाडी सहन करणार नसून बार्टी महासंचालक वारे आणि योजना विभाग प्रमुख भोसले ह्यांना लवकरच कायदेशीर नोटीस बजावली जाणार आहे.बार्टी च्या २६ डिसेंबर आणि १ फेब्रुवारी च्या पत्रातील निवडसूची नुसार पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप अवॉर्ड करण्याच्या दृष्टीने केवळ २०० विद्यार्थ्यांना दिले जाणारा अवॉर्ड प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अन्यथा दोन्ही अधिकारी आणि सचिव सामाजिक न्याय विभागाचे सचिव ह्यांचे विरुद्ध पोलीसा कडे ४२० ची तक्रार करीत उच्च न्यायालयात याचिका करून सर्व निवड झालेल्या ८६१ पात्र विध्यार्थ्यांना लाभाचा लढा न्यायालयात लढू असा इशारा देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.


       
Tags: #barti_fellowshipBARTIFELLOWSHIPRajendra PatodeVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

भिमजयंती निमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने “युवा अभिवादन” बाईक रॅलीचे आयोजन

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ऐतिहासिक कोनशीला काढून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करा; वंचित युवा आघाडीने केली मागणी.

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ऐतिहासिक कोनशीला काढून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करा; वंचित युवा आघाडीने केली मागणी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ऐतिहासिक कोनशीला काढून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करा; वंचित युवा आघाडीने केली मागणी.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले
Uncategorized

सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले

by mosami kewat
July 18, 2025
0

पुणे : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपले फासे टाकले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी दोघांना तब्बल...

Read moreDetails
समस्त वंचित समूहाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही : अंजलीताई आंबेडकर

समस्त वंचित समूहाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही : अंजलीताई आंबेडकर

July 18, 2025
बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

July 18, 2025
कांदिवली, चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

‎चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

July 18, 2025
‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

July 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home