माळशिरस : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतेच निधन झालेले पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. (Suraj Waghambare)
सुरज वाघंबरे यांच्या अकाली निधनाने चळवळीचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखातून त्यांना सावरता यावे, यासाठी आंबेडकरांनी संवेदना व्यक्त केल्या.
यावेळी सोलापूर पश्चिमचे जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप, अभिजीत गायकवाड, समाधान साबळे, भारतीय बौद्ध महासभा माळशिरस तालुका कोषाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आणि तालुका सरचिटणीस नागेश लोंढे यांनी सुरज वाघंबरे यांच्या पूजेच्या कार्यक्रमात उपस्थित राहून दुःख व्यक्त केले. (Suraj Waghambare)
सुरज वाघंबरे यांच्या निधनाने त्यांच्या पश्चात लहान मुली आणि वयोवृद्ध आई-वडील आहेत. कुटुंबातील एकुलता एक आधार हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सुरजसारखा तळमळीचा कार्यकर्ता अकाली गेल्याने चळवळीची मोठी हानी झाली आहे. वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुका सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांच्या सोबत असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन
मुंबई: महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकच्या प्रचाराची रणधुमाळी संपली. उद्या मतदान करण्याचा सोनेरी दिवस उगवणार आहे. वेगवेगळ्या भागातून नागरिक मतदान करून आपले...
Read moreDetails






