Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नेरुळमधील दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी फोर्टिस रुग्णालयाच्या डीनशी साधला संपर्क, योग्य उपचारांच्या सूचना

mosami kewat by mosami kewat
July 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नेरुळमधील दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी फोर्टिस रुग्णालयाच्या डीनशी साधला संपर्क, योग्य उपचारांच्या सूचना
       
नेरुळ, नवी मुंबई : नेरुळ येथील एल.पी. नाका परिसरात साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागून त्या गंभीर जखमी झाल्या. दोघींवर सध्या वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी फोर्टिस रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी फोर्टिस रुग्णालयाचे डीन देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. जखमी विद्यार्थिनींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत व त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, महावितरणच्या प्राथमिक तपासणीत पथदिव्यांच्या वीजजोडणीच्या केबलचे इन्सुलेशन तुटल्यामुळे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित वीजजोडणीची देखभाल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप विद्यार्थिनींचे जीव धोक्यात आल्याचा सांगितले. या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली.

तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता (परिमंडळ-१), संबंधित पर्यवेक्षक, कर्मचारी आणि देखभाल ठेकेदार यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही त्यांनी मागणी केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, उपाध्यक्ष गौतम चव्हाण, सतीश खंडाळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Electric shockMaharashtramumbaiPrakash Ambedkarstudent
Previous Post

लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Next Post

लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न! नांदेड महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होण्याच्या भीतीने गदारोळ: ॲड. शेख बिलाल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home