Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

mosami kewat by mosami kewat
July 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
       
जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव येथील पाटोदा साठवण तलाव भूसंपादन प्रकरणातील कथित अनियमितता आणि भूसंपादन अनुदान घोटाळ्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करत दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबे वडगाव ग्रामपंचायत आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रभावाखाली असल्याने पाटोदा साठवण तलावामुळे बाधित झालेल्या लिंबे वडगाव येथील दलित वस्तीतील मूळ रहिवाशांना राजकीय द्वेषातून, त्यांनी मतदान केले नसल्याच्या कारणावरून, जाणीवपूर्वक भूसंपादन प्रक्रियेतून वगळण्यात आले. तसेच सरपंच, ग्रामसेवक, परतूरचे उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने भूसंपादन अनुदानात घोटाळा झाल्याचा आरोपही करण्यात आला.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, बोरखेडीचे सरपंच मनोहर म्हस्के, ज्येष्ठ नेते एम. व्ही. चौधरी, सतीश डोंबे, दीपक जाधव, बाबासाहेब अवचार, परमेश्वर महाजन, अरुण खनपटे, आनंद जाधव, गौतम जाधव, सचिन भुतेकर, आसाराम होळकर, श्रीरंग खरात, विठ्ठल होळकर, दत्ता देवकाते, लक्ष्मण महाजन, दगडू खनपटे, रामप्रसाद विभुते, रमेश भुतेकर, विकास खनपटे, करण जाधव, विकास होळकर, विठ्ठल बोरकर, प्रभाकर खनपटे यांच्यासह शेकडो महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Tags: jalnaMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

नेरुळमधील दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी फोर्टिस रुग्णालयाच्या डीनशी साधला संपर्क, योग्य उपचारांच्या सूचना

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home