Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागोणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

mosami kewat by mosami kewat
June 18, 2025
in बातमी, विशेष, सामाजिक
0
ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागोणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागोणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त १० मे २०२५ रोजी एक भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा विषय होता – “बाळासाहेब आंबेडकर : कार्य आणि आंदोलनांची चार दशकांची प्रेरणादायी वाटचाल.

“या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, वंचित आणि बहुजन समाजासाठी केलेल्या सामाजिक आणि आंदोलनात्मक कार्यावर आधारित प्रभावी भाषणे दिली. त्यांच्या आंदोलनांमुळे मिळालेल्या अनेक सामाजिक लाभांचेही विश्लेषण करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, मिलिंद भाऊ इंगळे (जिल्हा महासचिव), भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष वानखडे सर, जिल्हा महासचिव डोंगरे सर आणि तालुकाध्यक्ष अशोकभाऊ दारोकार यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेस औरंगाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा अशा विविध जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ₹११,०००/- आणि सन्मान चिन्ह अमरावतीच्या ॲड. वैष्णवी संतोष हागोणे हिला मिळाले. तर द्वितीय पारितोषिक ₹५,०००/- कमरान अली यांना मिळाले. या पारितोषिकांचे वितरण नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते अकोला येथे करण्यात आले.या यशस्वी स्पर्धेचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील भाऊ इंगळे यांनी केले होते.

Tags: birthdaycompetitionoccasionPrakash AmbedkarState level
Previous Post

पुण्याजवळ पर्यटनस्थळ कुंडमळा येथे पूल कोसळला; मृतांचा आकडा ६ वर, अनेक जण गंभीर

Next Post

अग्निवीर मुरली नाईक यांना शहीदाचा दर्जा द्या, कुटुंबाला एक कोटींची मदत करा: प्रकाश आंबेडकरांची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला
बातमी

…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला

by mosami kewat
March 3, 2026
0

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या तालावर मुजरा करतायत : प्रकाश आंबेडकर मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी...

Read moreDetails
अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

March 2, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

March 2, 2026
‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

March 2, 2026
Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

March 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home