औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (२०२६) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपली पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर करून इतर पक्षांवर आघाडी घेतली आहे.
औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली असून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामुळे शहरात राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहरातील चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
या पहिल्या यादीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चारही जागांवर पक्षाने आपले उमेदवार उतरवून ‘सत्ता वंचितांच्या दारी’ हे ध्येय गाठण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे –
– सतीश दामू पट्टेकर, प्रभाग 09 अ, आरक्षण एससी
– शबनम कलीम कुरेशी, प्रभाग 09 ब, आरक्षण ओबीसी महिला
– शहनाज सलीम पटेल, प्रभाग 09 क, आरक्षण सर्वसाधारण महिला
– कलीम छोटु कुरेशी, प्रभाग 09 ड, आरक्षण सर्वसाधारण






