औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज प्रभाग २४ आणि प्रभाग २० मधील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर केले.
या उमेदवारांनी दाखल केले अर्ज:
प्रभाग २४ (अ): सतीश आसाराम गायकवाड
प्रभाग २० (अ): सुनील कैलास भुईगळ
प्रभाग २४ मधून सतीश गायकवाड आणि प्रभाग २० मधून सुनील भुईगळ यांच्या उमेदवारीमुळे या दोन्ही प्रभागांत आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

स्थानिक विकास, रस्ते, पाणी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचे यावेळी उमेदवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पक्षाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रस्थापित पक्षांसमोर वंचितने मोठे आव्हान उभे केले आहे.






