अकोला : खामगाव, बुलढाणा येथील रहिवासी रोहिण पैठणकर यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी अशोक सोनोने यांनी अकोला जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी रोहिण पैठणकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी अशोक सोनोने यांनी रोहिण पैठणकर यांच्या आईचे आणि शोषित पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. ते म्हणाले की, आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण वंचित बहुजन समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त तुमच्या मुलाच्या तब्येतीची काळजी घ्या. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी, अकोला महानगर पूर्व आणि युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित असलेल्यांमध्ये अशोक सोनोने (पार्लमेंट्री बोर्ड सदस्य, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पदाधिकारी), भीमराव तायडे साहेब (भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संघटक), मनोहर बनसोड (अध्यक्ष/सचिव, अकोला महानगर पूर्व), परागभाऊ गवई, पुरुषोत्तम अहीर, नितीन सपकाळ,
वैभव खडसे, अमोल कलोरे, निलेश वाहुरवाघ, आकाश गवई, आकाश जंजाळ, सूरज दामोदर, पुरुषोत्तम वानखडे, अवधूत खडसे, गजानन सुरवाडे, आर.एन. वानखडे, कवी शामस्कर यांच्यासह वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आरक्षणाशिवाय भरती, १० लाखांचा बॉन्ड अट; जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जाहीर केलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर...
Read moreDetails