Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Ashadhi Ekadashi 2025 : संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात, असा आहे पालखी मार्ग

mosami kewat by mosami kewat
June 18, 2025
in बातमी, विशेष, सामाजिक, सांस्कृतिक
0
संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात, असा आहे पालखी मार्ग

संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात, असा आहे पालखी मार्ग

       

देहूगाव (जि. पुणे) : श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. यामध्ये श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या प्रस्थान सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.

श्री संत तुकाराम महाराज चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला आहे. त्याला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच मंदिरात ४२ कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मंदिराच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. सकाळी भाजनी मंडपमध्ये प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी अडीचला पालखीचे प्रस्थान ठेवले जाणार आहे.

कसा आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग

१८ जून- देहूतून प्रस्थान १९ जून- आकुर्डी २० जून- नाना पेठ, पुणे २१ जून- निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे २२ जून- लोनी काळभोर २३ जून- यवत २४ जून- वरवंड २५ जून- उंडवडी गवळ्याची २६ जून- बारामती २७ जून- सणसर २८ जून- निमगाव केतकी, २९ जून- इंदापूर ३० जून- सराटी १ जुलै- अकलूज २ जुलै बोरगाव श्रीपूर ३ जुलै- पिराची करौली ४ जुलै- वाखरी ५ जुलै- पंढरपूर

पालखी सोहळ्यात रंगणार तीन उभे, तीन गोल रिंगण- बेलवडी येथे पहिले गोल रिंगण- काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण- इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण – सराटी येथे पादुकांना नीरास्नान – अकलूज येथे तिसरे गोल रिंगण – माळीनगर येथे पहिले उभे रिंगण तोंडले बोंडले येथे धावा- बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण – वाखरी येथे पादुका आरती आणि तिसरे उभे रिंगण- यंदा तिथीचा क्षय झाल्याने आंथुर्णे येथील पालखीचा मुक्काम रह- यंदा पालखी रथाच्या पुढे २७ व मागे ३७० दिंड्या सहभागी होणार


       
Tags: Ashadhi EkadashiAshadhi Ekadashi 2025dehupandharpurSantTukaram Maharaj
Previous Post

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता ‘या’ महिलांना मिळणार नाही: मोठी अपडेट समोर!

Next Post

Vanchit Bahujan Aaghadi : भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी VBA माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!

Next Post
भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी वंचित बहुजन माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!

Vanchit Bahujan Aaghadi : भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी VBA माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण; न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन - वंचित बहुजन आघाडी कडून गंभीर आरोप
बातमी

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण; न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन – वंचित बहुजन आघाडी कडून गंभीर आरोप

by mosami kewat
July 16, 2025
0

मुंबई : सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकरणातील...

Read moreDetails
नोकरीच्या आमिषाने २ तरुणींची ३० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

नोकरीच्या आमिषाने २ तरुणींची ३० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

July 16, 2025
ग्राहक आणि व्यवसायांना दिलासा: जीएसटीचे ५ मुख्य दर कमी होणार, १२% स्लॅब रद्द!

ग्राहक आणि व्यवसायांना दिलासा: जीएसटीचे ५ मुख्य दर कमी होणार, १२% स्लॅब रद्द!

July 16, 2025
हेमंत पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे निदर्शने

हेमंत पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे निदर्शने

July 16, 2025
आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी १५ ऑगस्टपर्यंत बंद; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच

आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी १५ ऑगस्टपर्यंत बंद; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच

July 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home