मुंबई : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या सासूबाई प्रेमाआई पांडुरंग साळवी यांचे आज मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकर कुटुंबीयांसह सामाजिक व राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
अंत्यविधीस वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे तसेच आंबेडकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
कुटुंबीयांनी प्रेमाआईंना आदरांजली अर्पण करून अंतिम दर्शन घेतले. आज त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.





