मुंबई : मुंबई येथील आझाद मैदानावर काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांती महासभेचे आयोजन केले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी संबोधित केले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव (अल्पसंख्यांक समुदाय ) शफाकत खान यांनी ट्विट करत म्हटले आहे की, तुम्ही विलक्षण कार्य केले आणि समुदाय तुमचे धैर्य लक्षात ठेवेल. पण त्याचा मतांवर फारसा परिणाम होणार नाही. मतांमध्ये रूपांतरित होण्यासाठी तुम्हाला २ गोष्टी कराव्या लागतील.
1) नेतृत्वात अल्पसंख्याकांचा चेहरा असावा.
2) सक्रिय सदस्यांसह अल्पसंख्याक संवर्ग असावा.
यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुक अहमद यांनी त्यांच्या या ट्विट ला उत्तर देत असे म्हटले आहे की, आमच्यासाठी ही सभा केवळ केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी नव्हती तर, ती मानवतेची आणि न्यायासाठीची गरज होती, आम्ही याकडे राजकीय फायदा किंवा तोटा या दृष्टिकोनातून पाहत नाही. विशेषतः जेव्हा मुस्लिमांची मते घेणारे लोक निरुपयोगी ठरतात.