Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आंबेडकरवाद्यांचा 36 चा आकडा कुणाशी?; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची खंत.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 14, 2022
in बातमी
0
आंबेडकरवाद्यांचा 36 चा आकडा कुणाशी?; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची खंत.
       

नागपूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे शनिवारी धंतोली येथील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजातील बुद्धिजीवी लोकांचे कान टोचले. ते म्हणाले, आर्थिक प्रश्न आणि आंबेडकरवादी यांचा ३६ चा आकडा राहिला आहे. आपल्यात खोगीर आंबेडकरवादी आहेत, ज्यांना ना धड आंबेडकरवाद कळला, ना धड क्रांती कळली. आपण आपली मानसिकताच कधी बदलली नाही. नोकरींच्याच मागे धावत राहिलो. आपण नेहमी सुरक्षित आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. इतक्या वर्षात आपण आपले बँकिंग सेक्टर उभे करू शकलो नाही. असुरक्षिता निर्माण झाली आहे ही बाब खरी आहे, त्याचे स्वागत करा. ती वाईट आहे; पण ती जाणवू तर द्या. ही असुरक्षितताच माणसाला काही करायला बाध्य करते, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपण आंबेडकरी चळवळ आणि क्रांती आपण खऱ्या अर्थाने समजूनच घेतली नाही. आपण केवळ जातीने आंबेडकरवादी झालो. विचारांनी आंबेडकरवादी झालो असतो, तर आज कुणासमोर हात पसरण्याची वेळच आली नसती. त्यामुळे जातीने आंबेडकरवादी होण्यापेक्षा विचारांनी आंबेडकरवादी व्हा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

जात व्यवस्थेशी लढण्यासाठी अर्थशास्त्र ताब्यात घ्या

जात व्यवस्थेशी लढण्यासाठी अर्थशास्त्र ताब्यात हवे, आताचे युग हे अर्थशास्त्राशी जुळले आहे. जात व्यवस्थेशी लढायचं असेल, तर अर्थशास्त्र आपल्या ताब्यात असणे आवश्यक आहे. भावनिकतेपेक्षा तर्क हे सर्वात मोठे लढाईचे शस्त्र राहणार आहे. तर्काच राजकारण करीत राहू, तर ही अर्थव्यवस्था टिकून राहू शकते. महाराष्ट्राचाच विचार केला, तर बौद्ध आंबेडकरी लोक खरेदीवर तब्बल १० लाख कोटी रुपये खर्च करतात. यातून सरकारला मिळणारा टॅक्स १७ ते १८ टक्के आहे. आता ही अर्थव्यवस्था आपल्यातच फिरवली तर मोठी क्रांती होऊ शकते, असे प्रतिपाद वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.


       
Tags: Prakash Ambedkar
Previous Post

स्वाधार योजनेचा २०० कोटी निधी असतानाही विद्यार्थी लाभापासून ‘वंचित’ !

Next Post

भारिपची दूरदृष्टी आणि फुले-आंबेडकरी नवे सामाजिक-राजकारण!

Next Post
बहुजन समाज महासंघ आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे विद्यमाने मंडल आयोग समर्थनार्थ लाखो लोकांच्या विराट मोर्चाद्वारे निवेदन.

भारिपची दूरदृष्टी आणि फुले-आंबेडकरी नवे सामाजिक-राजकारण!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
बातमी

ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!

by mosami kewat
October 10, 2025
0

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...

Read moreDetails
पिंपरी-चिंचवड: धावत्या 'ई-बस'ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

October 10, 2025
भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे.

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

October 10, 2025
जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 10, 2025
फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

October 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home