अहमदनगर (प्रतिनिधी) : आंबेडकर घराण्याचा विचार आणि आचाराचा वसा हरेगाव मध्ये ओथंबून वाहतो आहे. असे प्रतिपादन सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव वसंत पराड यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या चौदाव्या स्वाभिमान धम्म परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, 16 डिसेंबर 1939 ही श्रमण संस्कृतीतील महत्त्वाची कडी आहे. हरेगाव मध्ये बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भैय्यासाहेब आंबेडकर, महाउपासिका मीराताई आंबेडकर, ॲड. बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, सुजात आंबेडकर या चारही पिढ्यांनी हरेगावला भेट दिली. आंबेडकरी चळवळीतील हरेगाव मैलाचा दगड ठरले. 1939 साली येथे बारा बलुतेदार यांच्यावर आकारलेली जुडी, विना वेतन लादलेली कामे झुगारून स्वाभिमान जोपासण्याचा संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. ही आंतरराज्य परिषद होती. याप्रसंगी त्यांनी देशातील प्राचीन भारतातील श्रमण आणि ब्राह्मण संस्कृतीचा संघर्ष सविस्तर सांगितला.
राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी बौद्ध जीवन मार्गावर प्रकाश टाकला केंद्रीय कार्यालयीन सचिव केस अशोक केदारी यांनी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या अष्टांग चळवळी विषयी माहिती दिली. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विभागाचे प्रमुख डी टी सोनवणे यांनी धम्मचरणात पर्यटन स्थळांचे महत्त्व सांगितले. पहिल्या स्वाभिमान धम्म परिषदेचे अध्यक्ष व केंद्रीय शिक्षक सत्येंद्र तेलतुंबडे यांनी परिषदेची सातत्यता आणि आवश्यकता यावर विवेचन केले.
यावेळी भंते मोग्गलान,भंते प्रियदर्शी भंते प्रिय किर्ती आणि भंते परमानंद यांनी आपल्या श्रामनेर शिबिरातील अनुभव आणि झालेले परिवर्तनाची माहिती परिषदेला दिली. उपासिका प्रशिक्षण शिबिरातील महिला बोरगे,उज्वला तनपुरे आणि लता शिराळे यांनीही धम्म प्रशिक्षणातील आपली अनुभव विषद केले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट सोसायटीचे जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे होते. श्रामनेर संघाचे संघनायक भदंत कश्यप यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील आणि आशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बनसोडे यांनी केले. श्रीरामपूर तालुक्याच्या महासभेचे अध्यक्ष सरिता सावंत यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे परिचय स्वागत करून दिला. प्रारंभी समता सैनिक दलाचे प्रमुख रवींद्र जगताप यांनी सैनिक दलाचे संचालन व धम्मध्वजारोहण केले.
यावेळी हरेगाव बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष ॲड. किरण खाजेकर, सुनील शिनगारे, हरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप त्रिभुवन, ग्रामविकास अधिकारी आसने भाऊसाहेब, रोहिणी जाधव, डॉ आनंद खंडिझोड, मधुकर भालेराव, अहमदनगरचे पदाधिकारी संजय कांबळे संतोष कांबळे, अशोक बागुल, विजीत ठोंबे ,सुनील पंडित, दीपक गायकवाड, ॲड.रावसाहेब मोहन, प्रबुद्ध भारतचे आप्पासाहेब मकासरे, वंचित आघाडीचे गौतम पगारे, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष वैशाली अहिरे, लोकवेधचे अशोक जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा महासचिव अशोक बोरुडे , जिल्हा कोषाध्यक्ष आनंद मेढे, श्रीरामपूर शहराध्यक्ष लक्ष्मण म्हस्के, अण्णासाहेब झिने, अण्णासाहेब शरणागते, राहुल आल्हाट अरुणा पंडित, नाना पंडित, विमल मोरे ,श्रीकांत मोरे, प्रकाश सावंत, भाऊसाहेब हिरवळे, कैलास लोखंडे, निवृत्ती पगारे, हुसळे सर, भीमराव कदम, अजय साळवे, भूषण साळवे संजय महाले संतोष बनसोडे केंद्रीय शिक्षक शिक्षिका , बौद्धाचार्य , तालुका पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले .परिषदेला बौद्ध धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.