अमोल मिटकरी यांचे UPSC ला पत्र !
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी अरेरावी केली, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. पण, “चोर तो चोर वर शिरजोर” या म्हणीला साजेसा पवित्रा घेत त्यांच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी उलट अधिकाऱ्यांच्याच कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मिटकरी यांनी थेट UPSC ला पत्र लिहून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक व जातप्रमाणपत्र दस्तऐवजांच्या तपासणीची मागणी केली आहे. ही कारवाई म्हणजे अन्याय करणाऱ्याला वाचवणे आणि न्याय मागणाऱ्यालाच घाबरवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसते.
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. अशा वेळी त्यांच्या पक्षाचा आमदार अधिकाऱ्यांवरच संशय घेतो, ही सरळसोट मग्रुरी आहे. अधिकारी स्त्री आहे म्हणून तिला डावलण्याचा, धमकावण्याचा आणि तिची बाजू कमकुवत करण्याचा उघड प्रयत्न असल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे.
अजित पवार यांच्यावर आरोप असूनही त्यांच्या बचावासाठी महिला अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाते, हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक आणि प्रशासनासाठी अपमानास्पद आहे.