अकोला : अकोला जिल्हा मातंग समाज व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खदान पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत 14 वर्षे मातंग समाज अल्पवयीन मुलीवर आरोपी अमानवी कृत्य करून लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व मुलीला न्याय मिळण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
खदान पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कैलास टेकडी परिसरातील गावगुंड गणेश कुंबरे याने मातंग समाजाच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्यंत अमानवी कृत्य. केले त्याबाबत वंचित बहुजन महिला आघाडी व मातंग समाज कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आला.
सदर प्रकरण मध्ये फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे,आरोपीवर कठोर शिक्षा करण्यात यावी, पीडित मुलीचे व कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, पीडित मुलीचे शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारावी, पीडित मुलीला व कुटुंबाला कायमस्वरूपी संरक्षण द्यावे, वरील सर्व मागण्या पूर्ण करून त्वरित न्याय द्यावा तसेच भविष्यात असे गुन्हे घडू नये याची उपायोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनही देण्यात आले आहे.
यावेळी ,गजानन दांडगे, सुनंदाताई चांदणे, उमाताई अशोक अंभोरे, नारायण मानवटकर, भारती अंजनकार अण्णाभाऊ साठे उत्सव समिती अध्यक्ष गणेश सपकाळ, प्रशांत दवडे, हर्षल लोखंडे, गोकुळ मानकर, संतोष वाघमारे, भूपेंद्र अंभोरे, महादेव पळघवान, रामा मोरे ,गजानन तायडे , अशोकजी गायकवाड मंगेश इंगळे,तर वंचित चे कार्यकर्ते अरुंधती ताई शिरसाट, प्रभाताई शिरसाट , शोभाताई शेळके, पुष्पाताई इंगळे, प्रमोद शेंडगे, संतोष रहाटे, बाल मुकुंद भिरड, गजानन गवई, प्रतिभा अवचार, राजकुमार दामोदर, माया नाईक, श्रीकांत घोगरे, मंतोष मोहोड, रवि तायडे, आनंद खंडारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.