सालातूर : ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या निषेधार्थ रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड (वय ३५) या ओबीसी समाजातील तरुणाने मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भरत कराड हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात ते गेल्या काही वर्षांपासून सक्रिय सहभागी झाले होते. राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ‘कुणबी’ म्हणून ओबीसी आरक्षणात सामील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येईल, या चिंतेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या चिठ्ठीतून पुढे आली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरून कराड कुटुंबीयांशी संवाद साधून सांत्वन केले.
यावेळी घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीचे युवा राज्य सदस्य अमोल लांडगे, महासचिव ऍड. रोहित सोमवंशी, रेणापूर तालुकाध्यक्ष आर. के. आचार्य, डॉ. अजनिकर सर, निखिल आचार्य, विशाल मस्के, ॲड. निखिल उड्डानसिंग, अतुल कांबळे, सम्राट गोडबोले, कृष्णा वाघमारे तसेच नातेवाईक राम महादेव कराड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.—