लातूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले, ज्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पुढील वाटचालीवर भर देण्यात आला.
या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखणे, पक्षाची संघटना अधिक मजबूत करणे, प्रचार यंत्रणा प्रभावीपणे वापरणे या विषयांवर सखोल चर्चा झाली. तसेच, स्थानिक आणि सामाजिक प्रश्नांवर पक्षाची नेमकी भूमिका कशी असावी, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य डॉ. नितीन ढेपे, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके, राज्य सदस्य अविनाश भोसीकर, युवा आघाडी राज्य सदस्य अमोल लांडगे, जिल्हा निरीक्षक प्रवीण रणबागुल, शुद्धोधन सावंत, लातूर जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, आणि उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रवीण डिकले यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nepal Gen-Z Protest: नेपाळमध्ये Gen Z चा उद्रेक: बालेन शाह आणि सुदन गुरुंग यांच्या दोन पोस्ट्समुळे लाखो तरुण रस्त्यावर
नवी दिल्ली: नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे तरुणाईने पेटून उठत केलेल्या अभूतपूर्व आंदोलनापुढे सरकारला अखेर नमते घ्यावे लागले आहे. या आंदोलनाचा...
Read moreDetails