पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न
अहमदनगर : आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका पारनेर तालुका वंचित आघाडी पूर्ण ताकतीने लढणार आणि स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका जिंकणार असल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी व्यक्त केला. ते पारनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील आयोजित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक आणि कार्यकर्ता मेळावा प्रसंगी केले.
योगेश साठे यावेळी म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर यांना साथ सहयोग देणे आणि पारनेर तालुक्यातील तळागाळातील बहुजन समाजातील होतकरू तरुणांना सोबत घेऊन सर्व समावेशक संघटन उभारण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना राजकीय ताकद देऊन पारनेर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीसाठी सर्वोतपरी प्रयत्नशील राहणार असल्याची घोषणा केली.
यावेळी जिल्हास्तरीय फुले,शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पातारे यांच्यावर पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीची मोठी जबाबदारी देणार असल्याचे सूतोवाच यावेळी केले. बहुजन समाजातील कार्यकर्त्यावर अन्याय अत्याचार होत असेल त्यावेळी त्यांच्या मदतीला २४ तास कधीही उपलब्ध राहणार आहे. बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीची सभासदत्व वाढवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी केले.
या मेळाव्याचे प्रास्ताविक बाळासाहेब पातारे यांनी केले तर अनुमोदन राजेंद्र करंदीकर यांनी दिले. यावेळी आगडगाव ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक रवींद्र शिरसाठ, प्रसाद भिवसने, राजेंद्र करंदीकर, बाळासाहेब पातारे आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, सुधीर ठोंबे, जे डी शिरसाठ, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन राजेंद्र करंदीकर, सुरेश रोकडे, बाळासाहेब पातारे, संतोष केदारी, संतोष विधाटे, आकाश गायकवाड, प्रदीप कसबे, संतोष अडसूळ, जय गायकवाड, दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, राजू गायकवाड, महेश पंडित,
रफिक शेख, रवींद्र साळवे, विकास गायकवाड, चंद्रकांत सातपुते, संतोष वाबळे, सतीश सूर्यवंशी, रामदास कसबे, मोहन कसबे, अक्षय जाधव, संभाजी उघडे, राजू उघडे, अनिल सातपुते, सुरेश सातपुते, चंद्रकांत सातपुते,मच्छिंद्र साळवे, मनोज सूर्यवंशी, माही सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.