सोन्याच्या दरांनी सध्या उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत घेतलेल्या काही मोठ्या निर्णयांमुळे सोन्याच्या दरात बदल झाल्याचं दिसून येत आहे. या बदलांमुळे, देशभरातील सोन्याच्या किमतींमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला, तर चांदीच्या दरातही बदल झाले आहेत.
आजचे सोन्या-चांदीचे भाव
बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार, ५ सप्टेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,०७,२४० आहे, तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ₹९८,३०३ आहे.
चांदीच्या दरांबद्दल बोलायचं झाल्यास, १ किलो चांदीचा भाव ₹१,२४,४८० पर्यंत पोहोचला आहे, तर १० ग्रॅम चांदीसाठी ₹१,२५५ मोजावे लागत आहेत.
सोन्याच्या दागिन्यांच्या किमती देशभरात सारख्या नसतात. उत्पादन शुल्क, राज्यानुसार लागणारे कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या किमतींमध्ये फरक असतो.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील दर
मुंबई : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹९८,१२०, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,०७,०४०.
पुणे : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹९८,१२०, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,०७,०४०.
नागपूर : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹९८,१२०, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,०७,०४०.
२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यामधील फरक
सोनं खरेदी करताना तुम्हाला २२ कॅरेट आणि २४ कॅरेट असे पर्याय दिले जातात. त्यामुळे या दोन्हीमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.
२४ कॅरेट सोने : हे ९९.९% शुद्ध असते. हे सोने अत्यंत मऊ असल्याने त्याचे दागिने बनवता येत नाहीत. हे सोने मुख्यतः सोन्याची नाणी किंवा बिस्किटे बनवण्यासाठी वापरले जाते.
२२ कॅरेट सोने : हे सुमारे ९१% शुद्ध असते. यामध्ये तांबे, चांदी किंवा जस्त यांसारखे ९% इतर धातू मिसळले जातात. यामुळे हे सोने अधिक मजबूत बनते आणि त्यापासून टिकाऊ दागिने तयार करता येतात.