नागपूर : दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी तर्फे पक्षप्रवेश सोहळा व कार्यकारिणी मुलाखत बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान शहराध्यक्ष मंगेश वानखेडे यांनी भूषविले तर महासचिव राहुल दहीकर, धम्मदीप लोखंडे व नागपूर शहर कार्यकारी अध्यक्ष सिद्धांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी रिटायर्ड आयएनएस सायंटिस्ट रामटेके, वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर समितीचे विशेष सल्लागार डॉ. राजेंद्र डोंगरे, तसेच अमरावती विद्यापीठाचे प्रा. नाईक उपस्थित होते. दक्षिण पश्चिम महिला आघाडीच्या कांचन देवगडे, मंदा गवळी, भारती धोटे, जयश्री बोरकर यांनीही उपस्थिती दर्शविली.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, बीआरएसपी आदी पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यात शुद्धधन हाडके, भगवान शेंडे, विष्णू गवई, विजय वानखेडे, रमेश खडसे, दहातोंडे, शैलेश पाटील आदींचा समावेश आहे. नॅशनल फायर सेफ्टी अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक मनोज सुटे व टीम इलेव्हनचे संचालक कमलेश वाहने यांनीही पक्ष प्रवेश केला.
या सोहळ्यात दक्षिण पश्चिम विधानसभा कार्यकारिणी पदांसाठी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी शहर उपाध्यक्ष अतुल गजभिये, विनोद मोहोळ, किशोर धोटे, सिद्धार्थ भांगे, हरिदास गवई, नितीन लबडे, विलास लोखंडे, शिशुपाल देशभरतार, विजय गोंडुळे, राहुल भीमटे, बबीता नितनवरे, दत्ताजी डोळस, शुद्धधन दाभार्र्डे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीत विभागीय कार्यकारिणी व प्रभाग कार्यकारिणीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.