अकोला : वंचित बहुजन आघाडीची (VBA) अकोला पश्चिम महानगर बैठक नुकतीच अकोला येथील व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. ही बैठक वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि अकोला जिल्हा समन्वयक ऍड. खतीब साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. अकोला पश्चिम महानगर अध्यक्ष कलीम भाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे व्हीआयपी सर्किट हाऊसच्या हॉलमधील जागा अपुरी पडली. त्यामुळे, आयोजकांना ही बैठक हॉलसमोरील मोकळ्या जागेत घ्यावी लागली. या बैठकीत, कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिलेल्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीला प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा समन्वयक ऍड. खतीब साहेब, जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महानगर अध्यक्ष कलीम भाई, महासचिव गजानन गवई, तसेच आकाश दादा शिरसाठ, रौफ पैलवान, ऍड. अन्वर शेरा, मनतोषी मोहोळ, आणि वसीम यांचा समावेश होता.
संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार – ॲड. एस. के. भंडारे
सांगली : “भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे आहे. संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी करूनच समताधिष्ठित समाज उभारता येईल,”...
Read moreDetails