अकोला : अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे वंचित बहुजन आघाडीची सर्कल बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत मुंडगाव जिल्हा परिषद सर्कलमधील कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवून ‘मुंडगाव हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला कायम ठेवू’, असा निर्धार केला.
या बैठकीला जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्षा आम्रपाली खंडारे, बुलढाणा प्रभारी प्रदीप वानखडे, शोभा शेळके, तालुकाध्यक्ष चरण इंगळे, निखिल गावंडे, व तुषार पाचपोर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहरराव शेळके, रोशन फुंडकर, सुरेंद्र ओइंबे, आशिष रायबोले, मयूर सपकाळ, अजीज अहेमद, जुगल पिंपळे यांच्यासह इतरही अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.