पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अंतर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २८ आणि ३७ मध्ये पक्षाच्या दोन नवीन शाखांचे उद्घाटन नुकतेच झाले. पुणे शहर अध्यक्ष अॅड अरविंद तायडे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी अनेक तरुणांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद वाढण्यास मदत होईल. या शाखांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी काम केले जाईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला युवक अध्यक्ष सागर आल्हाट, प्रा. बी. पी. सावळे, शाम गोरे, नवनीत अहिरे, संदीप चौधरी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या दोन्ही शाखांचे उद्घाटन यशस्वी करण्यासाठी पुणे शहर उपाध्यक्ष परमेश्वर सनादे यांनी विशेष प्रयत्न केले. या