Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ग्रामसभेतील वादातून महिला सरपंचावर पेट्रोल हल्ला; दुचाकी जाळून खाक, मुलगा बचावला‎‎

mosami kewat by mosami kewat
August 20, 2025
in बातमी
0
ग्रामसभेतील वादातून महिला सरपंचावर पेट्रोल हल्ला; दुचाकी जाळून खाक, मुलगा बचावला‎‎
       
श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावात मातंग समाजाच्या महिला सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांचा मुलगा थोडक्यात बचावला असून, हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी जाळून खाक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.‎‎मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान सरपंच मीनाक्षी सकट आणि त्यांचा मुलगा सार्थक दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर पेट्रोल हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्यांची दुचाकी आणि त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली, तर सरपंच मीनाक्षी सकट यांची साडी जळून त्यांचे पाय भाजले आहेत. त्यांचा मुलगा सार्थक प्रसंगावधान राखत तिथून पळून गेल्याने त्याचा जीव वाचला, मात्र त्याला मार लागला आहे.‎‎या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत शरद लाटे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा (क्र. ०७७५/२०२५) दाखल केला आहे.

पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसून, या घटनेचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडीने आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.‎‎काही दिवसांपूर्वी ग्रामसभेत मीनाक्षी सकट यांना जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित करण्यात आले होते. तसेच, त्यांच्या वडिलोपार्जित जागेतील अतिक्रमणाविरोधात कारवाई केल्याने आरोपींनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

याआधी संदीप वागस्कर, विलास वागस्कर आणि शरद लाटे यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच रागातून आरोपींनी हा हल्ला केल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही अशा प्रकारे एका लोकप्रतिनिधी महिलेवर हल्ला झाल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे.

Tags: attackcrimeprotestvbaforindiaश्रीगोंदा
Previous Post

वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहराच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी साहित्य वाटप‎‎

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी साहित्य वाटप‎‎

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी साहित्य वाटप‎‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home