Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी साहित्य वाटप‎‎

mosami kewat by mosami kewat
August 20, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी साहित्य वाटप‎‎
       

मुंबई : मुंबईत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत पात्र महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्रांचे वितरण अखेर करण्यात आले आहे. या वितरणात होत असलेल्या विलंबाविरोधात वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हे वाटप शक्य झाले आहे.‎‎

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वप्नील राजेंद्र जवळगेकर यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी मुंबई महापालिकेला अधिकृत निवेदन देऊन वाटपातील विलंबाबद्दल तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच, या वाटप कार्यक्रमात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती.

जर खासदार, आमदार किंवा माजी नगरसेवकांनी यात हस्तक्षेप केला तर आंदोलन करून वाटप थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.‎‎या दबावामुळे अखेर आज कुर्ला नेहरू नगर येथे मुंबई महानगरपालिका ‘एल’ विभागाच्या वतीने पात्र महिलांना ही यंत्रसामुग्री वितरित करण्यात आली.

विशेष म्हणजे, काही अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी आमदार मंगेश कुडाळकर यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामुळे आमदार कुडाळकर कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. यामुळे हा कार्यक्रम पूर्णपणे राजकारणमुक्त आणि पारदर्शक पार पडला.‎‎या यशस्वी वाटपानंतर लाभार्थी महिलांनी वंचित बहुजन आघाडी आणि स्वप्नील जवळगेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. “महिलांच्या हक्काचा हा विजय म्हणजे वंचितांच्या संघर्षाचे फलित आहे,” अशा भावना महिलांनी यावेळी व्यक्त केल्या.


       
Tags: mumbaiprotestvbaforindiaWomen
Previous Post

ग्रामसभेतील वादातून महिला सरपंचावर पेट्रोल हल्ला; दुचाकी जाळून खाक, मुलगा बचावला‎‎

Next Post

भाजपच्या गडाला धक्का: कामठीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश

Next Post
भाजपच्या गडाला धक्का: कामठीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश

भाजपच्या गडाला धक्का: कामठीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home