Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे: कोथरूड पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या मुलींविरोधातच गुन्हा दाखल; नेमक कारण काय?

mosami kewat by mosami kewat
August 18, 2025
in बातमी
0
पुणे: कोथरूड पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या मुलींविरोधातच गुन्हा दाखल; नेमक कारण काय?

पुणे: कोथरूड पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या मुलींविरोधातच गुन्हा दाखल; नेमक कारण काय?

पुणे : कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुली आणि त्यांना मदत करणाऱ्या श्वेता पाटील व अन्य एका व्यक्तीसह एकूण पाच जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, त्यांना कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. पोलिसांनी संपूर्ण घटना पोलीस स्टेशनच्या आत (इंडोर) घडल्याचे एक पत्र आंदोलकांना दिले. मात्र, श्वेता पाटील यांनी हे पत्र पोलिसांसमोरच फाडून टाकले.

याशिवाय, ज्या मुलींनी मारहाणीचा आरोप केला होता, त्यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल देखील समोर आला. या अहवालात मारहाणीच्या कोणत्याही ताज्या जखमा किंवा व्रण नसल्याचे समोर आले. या सगळ्या प्रकरणानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 132 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आंदोलन करत असताना यामध्ये तीन पीडित मुली, श्वेता पाटील आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित होते, मात्र त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

काय आहे प्रकरण?

1 ऑगस्ट रोजी, तीन मुलींनी कोथरूड पोलिसांवर मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी तपास करताना “तुम्ही महारा-मांगाच्या पोरी आहात”, “किती मुलांसोबत झोपल्या आहात”, “तुम्ही लेस्बियन आहात का?” असे प्रश्न विचारल्याचा आरोप या मुलींनी केला होता.

या आरोपांनंतर, या मुली आणि त्यांचे सहकारी आक्रमक झाले. त्यांनी कोथरूड पोलिसांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये त्यांना श्वेता पाटील, परिक्रमा खोत, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर आणि इतर 50 ते 60 सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला.

Tags: Anjali AmbedkarcasecrimeKothrudpoliceprotespuneSujat Ambedkar
Previous Post

पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशात बेकायदा उपवर्गीकरण? वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडी अकोटची राष्ट्रध्वज अभिवादन बाईक रॅली, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
वंचित बहुजन युवा आघाडी अकोटची राष्ट्रध्वज अभिवादन बाईक रॅली, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वंचित बहुजन युवा आघाडी अकोटची राष्ट्रध्वज अभिवादन बाईक रॅली, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘वंचित’च्या प्रचाराचा धडाका! हक्काच्या विकासासाठी आणि शेतकरी प्रश्नांसाठी ‘वंचित’ला साथ द्या: सुजात आंबेडकर
बातमी

‘वंचित’च्या प्रचाराचा धडाका! हक्काच्या विकासासाठी आणि शेतकरी प्रश्नांसाठी ‘वंचित’ला साथ द्या: सुजात आंबेडकर

by mosami kewat
February 3, 2026
0

लासुर : "सत्ताधाऱ्यांनी आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली, पण शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न आजही कायम आहेत. आता केवळ आश्वासनं नको,...

Read moreDetails
अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

February 3, 2026
भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

February 3, 2026
११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

February 3, 2026
प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

February 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home