औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई वेंकट सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या खटल्याची सुनावणी झाली. विजयाबाई सूर्यवंशी यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) एका आठवड्याच्या आत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्या विजयाबाई वेंकट सूर्यवंशी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
महाराष्ट्र सरकारने यापूर्वी नेमलेली चौकशी समिती बरखास्त करण्यात येणार आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे SIT कडे सोपवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्या विजयाबाई वेंकट सूर्यवंशी यांना जर SIT च्या सदस्यांवर काही आक्षेप असेल, तर त्या तो न्यायालयात नोंदवू शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.
पिंपरीत किवळे-रावेत मेट्रो मार्गाच्या DPR साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक शहर आहे. औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि...
Read moreDetails






