भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केली आहे. नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी आता येत्या ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ७ ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार आहे. तर २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख २५ ऑगस्ट असेल.
९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून, सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही मतदानाची वेळ असेल. तसेच मतदान आटोपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.
सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाची खुर्ची रिकामी झाली होती. आता नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगानं पुढाकार घेतला असून, लवकरच नवीन उपराष्ट्रपती निवडले जातील.
पुस्तक परीक्षण -जीवन चलने का नाम
मनुष्य आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आयुष्यभर पळत असतो. या धावपळीच्या जीवनामध्ये जणू काही तो स्वतःला विसरून जातो, आपल्याला काय आवडतं?...
Read moreDetails