उदगीर – वंचित बहुजन आघाडी, उदगीर तालुक्याच्या वतीने आज भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून सामाजिक परिवर्तनाच्या कार्यास बळकटी दिली.
या सोहळ्याला लातूर जिल्हाध्यक्ष सलीम भाई सय्यद, तालुकाध्यक्ष देविदास बोंबळीकर व तालुका महासचिव पी. डी. कांबळे प्रमुख उपस्थितीमध्ये होते. त्यांच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम पार पडला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये विशेषतः महिला, भटकेनाथ जोगी समाज, कलाल समाज व मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.
या नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे वंचित आघाडीचा जनाधार अधिक मजबूत झाला आहे. कार्यक्रमास तालुका व शहर कार्यकारिणीतील सर्व सदस्य तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.