नालासोपारा : वंचित बहुजन आघाडीच्या नालासोपारा (पश्चिम) येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी शहर प्रमुख समीर शेख यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
यासोबतच, दयानंद गमरे यांच्या अध्यक्षतेखाली नालासोपारा (पूर्व) भागातील कार्यकर्त्यांनीही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी नालासोपारा शहरातील विविध पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला गीताताई जाधव (अध्यक्षा, महिला आघाडी, वसई-विरार महापालिका क्षेत्र), आनंद पाडमुख (संघटक, महापालिका क्षेत्र), प्राजक्ता जाधव (अध्यक्षा, नालासोपारा शहर), राज वानखेडे (महापालिका आय.टी. सेल प्रमुख), आणि समीर शेख यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात हा पक्षप्रवेश कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...
Read moreDetails