अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पारस गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपूस केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नागरिकांनी तक्रार केली की, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची योग्य माहिती घेतली नाही. केवळ घरमालकांचे आणि मोबाईल नंबर लिहून घेण्यात आले, असे नुकसानग्रस्तांनी सांगितले. नागरिकांच्या या तक्रारी ऐकून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी तालुका पदाधिकारी आणि तालुका महिला आघाडी अध्यक्षांना बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्याच्या सूचना दिल्या.
या भेटीदरम्यान जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासोबत जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अनुराधाताई डांगे, गजानन गवई, जायदाबी ताई, गजाननभाऊ दांदळे (जि.प. सदस्य), पद्माकर तायडे (मा. ता. अध्यक्ष भारिप), भास्कर सिरसाट (सर्कल अध्यक्ष), शेख शारिक भाई (मा. ता. कोषाध्यक्ष), शेख रईस भाई, हमिद भाई (मा. प.स. सदस्य), विनित भारसाकडे (सर्कल उपाध्यक्ष), प्रदीप तायडे (युवक महासचिव), शेख जमिल, नितेश तायडे, बाबुराव इंगळे, पारस सर्कल पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई आणि पुण्यात Ola-Uber प्रवास ५० टक्क्यांनी महागणार?
मुंबई आणि पुण्यातील अॅप-आधारित टॅक्सी प्रवाशांना लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. Ola आणि Uber च्या ड्रायव्हर्सनी केलेल्या संपानंतर राज्य...
Read moreDetails