Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चेंबूरमध्ये बिल्डर सुशील रहेजाकडून बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
February 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
चेंबूरमध्ये बिल्डर सुशील रहेजाकडून बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       
मुंबई: मुंबईतील चेंबूर परिसरात रहेजा बिल्डरने आपल्याच बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कागदपत्रे व्यवस्थित स्टेपल न केल्याच्या शुल्क कारणावरून बिल्डर सुशील रहेजाने राहुल जाधव या तरुणाला मारहाण करत अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात रहेजा यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजा याच्याकडे कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी कागदपत्रे (पेपर) नीट स्टेपल न केल्याचा राग मनात धरून रहेजा यांनी राहुलला मारहाण केली. केवळ इतक्यावरच न थांबता, “तुम घाटी जय भीम वाले लोग कभी सुधरेगा नही” असे वादग्रस्त आणि जातीवाचक शब्द वापरून त्याचा अपमान केला व स्टाफ समोरच मारहाण केली. (Vanchit bahujan aghadi)

वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका –

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे माजी चेंबूर तालुका अध्यक्ष हरीश काशीद यांनी पीडित राहुल जाधव याला सोबत घेऊन थेट डीसीपी समीर शेख यांचे कार्यालय गाठले. काशीद यांनी या अन्यायाविरुद्ध दाद मागत बिल्डरवर कडक कारवाईची मागणी केली. डीसीपी समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गोवंडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. (Vanchit bahujan aghadi)

गुन्हा दाखल आणि अटकेची मागणी –

गोवंडी पोलिसांनी हरीश काशीद आणि पीडित राहुल जाधव यांची जबानी नोंदवून घेतली असून, बिल्डर सुशील रहेजा याच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुंबईत मराठी-अमराठी वादाचे वातावरण तापलेले असताना, अशा प्रकारे मराठी तरुणाला जातीवरून लक्ष्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (Vanchit bahujan aghadi)

बिल्डर सुशील रहेजा याला तात्काळ अटक करण्यात यावी. कायद्याचे राज्य आहे, अशा प्रवृत्तींना धडा शिकवलाच पाहिजे. जर पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हरीश काशीद यांनी दिला आहे. पीडित तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक स्तरावरून मागणी होत आहे.

Tags: ConstitutioncrimeDr Babasaheb AmbedkarJusticeMaharashtramumbaipoliceVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन

Next Post

‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

Next Post
‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

'गृहमंत्र्यांना बोलवा!' सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home