पुणे : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपले फासे टाकले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी दोघांना तब्बल ६१.९७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. नागरिकांना सायबर फसवणुकीचे प्रकार वारंवार निदर्शनास येत असूनही, ते या भामट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते. याप्रकरणी स्वारगेट आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pune cyber fraud)
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २९ वर्षीय तरुणाला २५ लाखांचा गंडा
पहिली घटना स्वारगेट परिसरातील गुलटेकडी, मुकुंदनगर येथे घडली. २९ वर्षीय तरुणाला सायबर चोरांनी एप्रिल महिन्यात एका लिंकद्वारे एका वेबसाईटवर रजिस्टर करण्यास सांगितले. त्यानंतर व्हॉट्सॲपवर शेअर ट्रेडिंगसंदर्भात मेसेज पाठवून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडून तरुणाने २५ लाख ३० हजार रुपये गुंतवले. मात्र, त्यानंतर त्याला कोणतीही रक्कम परत मिळाली नाही किंवा कोणताही परतावा मिळाला नाही, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारमळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ज्येष्ठ नागरिकालाही ३६ लाखांहून अधिक रकमेला फसवले
दुसऱ्या घटनेत बिबवेवाडी येथील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरांनी लक्ष्य केले. त्यांनाही शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकांनी ३६ लाख ६७ हजार ७८ रुपये गुंतवले. ही फसवणूक २४ मार्च २०२३ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत घडली.
गुंतवणूक केल्यानंतर मूळ रक्कम किंवा कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाचाही पोलीस पुढील तपास करत आहेत. सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या वापरत असल्याने, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषांपासून सावध राहावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले
पुणे : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपले फासे टाकले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी दोघांना तब्बल...
Read moreDetails